दादांनी आपलं प्रॉमिस मोडलं – मेधा कुलकर्णी

दादांनी आपलं प्रॉमिस मो-Dada made his promise to Mo.

दादांनी आपलं प्रॉमिस मोडलं – मेधा कुलकर्णी

भाजपच्या पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी डावलल्याने त्या पाटील आणि भाजप पक्षावर नाराज झाल्या आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अनेक वेळा मला विधानपरिषदेवर पाठवणार असल्याचे जाहीर सांगितले होते. आधी विधानसभा आता विधानपरिषदेला डावललं, माझं नेमकं काय चुकलं? हे पक्षाने सांगाव, असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या आहेत. माझा पहिला अधिकार होता, कारण मला अनेक वेळा प्रॉमिस केलं होतं. दादांनी प्राॅमिस मोडलं, माझं नेमकं काय चुकलं हे पक्षाने सांगावं, असं सांगताना मेधा कुलकर्णींना अश्रू अनावर झाले.

मी पक्षाशी बांधील असून कुठे जाणार नाही, मी पक्ष विरोधात कोणतीही भूमिका घेणार नाही, हाच माझा कमकुवतपणा असेल असे त्यांना वाटत असल्याची शंका मेधा कुलकर्णींनी व्यक्त केली आहे. दरम्यान, मला तिकीट दिलं नव्हते. मी पडलेली नव्हते, तर आश्वासन देऊन मला थांबवलं होतं. मी पक्षाची पंचवीस वर्षापासून कार्यकर्ती आहे. पक्ष कुठेच नसताना मी निष्ठेनं काम केलेलं आहे. वेगवेगळी प्रलोभने आली असतानाही मी पक्ष सोडला नाही. अत्यंत कठीण, वाईट परिस्थितीत पक्षाला मी विजय मिळवून दिला आहे, असंही मेधा कुलकर्णी यांनी सांगितलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here