Skip to content Skip to footer

आमदार कोळंबकर यांच्या निष्काळजीपणामुळे नांयगाव-वडाळ्यात वाढली कोरोना रुग्णांची संख्या!

आमदार कोळंबकर यांच्या निष्काळजीपणामुळे नांयगाव-वडाळ्यात वाढली कोरोना रुग्णांची संख्या!

सध्या देशात तसेच राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्यातच काही अंशतः मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. मात्र मुंबई शहराची ही परिस्थिती असताना, तसेच नायगांव-वडाळा विभागात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना सुद्धा या विभागाचे भाजप आमदार कालीदास कोळंबकर यांना परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे, अशी चर्चा सध्या नायगाव-वडाळ्यात आहे.

एकीकडे प्रशासन आणि पोलिस खाते नागरिकांना गर्दी न करण्याची कळकळीची विनंती करत असताना आमदार कोळंबकर यांच्या एका कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. या गर्दीमुळे एकूण जमलेल्यांपैकी 6 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. तसेच संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईल करण्यात आले. त्यामुळे एक प्रकारेचे भीतीचे वातावरणच या भागात निर्माण झाले आहे.

एकीकडे शासन पूर्णपणे खबरदारी घेऊन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असताना एका जबाबदार लोकप्रतिनिधीने या संकटात कशा प्रकारे वर्तणूक केली पाहिजे अशी व अनेक उलट-सुलट चर्चा नायगाव- वडाळा विभागात होताना दिसत आहे. या प्रकरणानंतर पोलीस खात्याकडून आमदार कोळंबकर तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना समज वजा इशारा देखील देण्यात आला आहे.

Leave a comment

0.0/5