भाजपचे आंदोलन ट्रोल – नेटकऱ्यांनी भाजप कार्यकर्त्यांना सडकवून धुतले.

भाजपचे आंदोलन ट्रोल - नेटक-BJP's agitation troll - netak

भाजपचे आंदोलन ट्रोल – नेटकऱ्यांनी भाजप कार्यकर्त्यांना सडकवून धुतले.

सरकार निष्क्रिय आहे, सरकार या संकटात महाराष्ट्राला सांभाळण्यात अपयशी ठरत आहे, असे सांगत भाजप महाराष्ट्राने आंगण हेच रणांगण हे आंदोलन आज सुरु केले होते. सर्व भाजप कार्यकर्त्यांना काळे फित, काळे कपडे आणि काळ्या गोष्टी वापरत सरकार विरोधात निषेध करण्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काल फेसबुकच्या माध्यमातून दिली होती.

परंतु कार्यकर्ते आणि भाजप समर्थकांनी आजच्या आंदोलनाकडे पाठ फिरवत घरामध्ये राहूनच एकंदरीत महाराष्ट्रात होणारी आंदोलनाची मजा बघण्यास पसंत केले. काल पाटील यांनी आवाहन करताच नेटकऱ्यांनी त्यांना चांगलेच ट्रोल करण्यास सुरुवात झाली आणि पाहता पाहता संपूर्ण सोशल मीडियावर या आंदोलनाची खिल्ली उडवण्यास नेटकऱ्यांनी सहभाग घेतला. तसेच #महाराष्ट्रद्रोही असा एक हॅशटॅग देखील नेटकऱ्यांनी वापरत भाजपच्या आंदोलनाला ट्रोल केले आहे.

भाजपा आमदार, खासदार, नगरसेवक एवढेच नाहीतर सध्या कार्यकर्त्यांना देखील कॉमेंट आणि मेसेजवरून ट्रोल केले जात असल्याचे दिसले. या परिस्थितीमध्ये ट्रोलर्स पासून वाचण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी घरात राहणे पसंत केले. त्यामुळे हे आंदोलन फेल झाल्याचे दिसून येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here