हे नक्की कोणत्या भाजपा आमदाराचे घर आहे?

हे नक्की कोणत्या भाजपा आम-This is exactly which BJP mango

हे नक्की कोणत्या भाजपा आमदाराचे घर आहे?

भाजपाने आज राज्यात महाराष्ट्र बचाव आंदोलन सुरू करून महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा आज प्रयत्न केला होता. आघाडीचे सरकार राज्यातील कोरोनाची स्थिती हाताळण्यास असमर्थ असल्याच्या मुद्द्यावरून भाजपाने हे आंदोलन पुकारले होते.

दरम्यान, एका बंगल्यापुढे सहा कच्चेबच्चेही हातात सरकार विरुद्धचे बॅनर घेऊन, तोंडाचा मास्क अर्धवट काढून उभे आहेत. या फोटोचा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी निषेध करत भाजपा नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. हे चित्र पूर्णपणे लज्जास्पद आणि चिंताजनक असल्याचे देखील ठाकरे म्हणाले आहेत.

सत्तेची लालसा नेत्यांना काय काय करायला भाग पाडते, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच हा फोटो पोस्ट करून राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळ व अनेक नेत्यांनी देखील मुलांना अशाप्रकारे राजकारणाचा मोहरा बनवण्यात आल्याबद्दल निषेध व्यक्त केला आहे.

पण, आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो नेमका कोणत्या भाजपा नेत्याच्या घरा समोरचा आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार हा फोटो भोसरी मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्या घरा समोरील आहे.

महाभयंकर आजाराच्या काळात लहान मुलांना सुरक्षित घरी ठेवायला हवे. त्याऐवजी त्यांना उन्हात उभे केले जात आहे आणि राजकारणाची जान नसूनही, या चिमुकल्यांना बाहुली बनवून अशाप्रकारे उभारण्यात आल्याने सोशल मीडियावर टीकेचं एकचं झोड उठले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here