Skip to content Skip to footer

मुख्यमंत्री चांगलं काम करत आहेत! – शरद पवारांजवळ राज्यपालांचा निरोप.

मुख्यमंत्री चांगलं काम करतायेत! – पवारांजवळ राज्यपालांचा निरोप.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी कोरोनाच्या कठीण काळात तुम्ही सगळे एकत्र काम करत आहात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील चांगलं काम करत आहेत, असे राज्यपाल कोश्यारी शरद पवार यांना म्हणाले. दस्तुरखुद्द पवारांनीच ही माहिती दिली असून, राज्यपालांनी दोनवेळा आमंत्रण दिले होते. त्यामुळे मी त्यांना काल भेटायला गेलो. मी कृषीमंत्री असताना कोश्यारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते, असे पवारांनी आवर्जून सांगितले.

तसेच राज्यपाल आणि आमच्यात जुन्या आठवणींवर देखील गप्पा झाल्याचं पवारांनी यावेळी सांगितलं. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. कोरोना महामारीच्या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासंबंधी सगळी ताकद लावयचं हे सरकारचं उदिष्ट आहे. सरकार आणि प्रशसान त्यांच्या पद्धतीने योग्य काम करत आहेत, असं देखील पवार म्हणाले.

Leave a comment

0.0/5