राज्यात पुन्हा खांदेपालटाची चर्चा वाचा सविस्तर वृत्त…..!

राज्यात पुन्हा खांदेपालटा-Shoulder shift in the state again

राज्यात पुन्हा खांदेपालटाची चर्चा वाचा सविस्तर वृत्त…..!

महाराष्ट्रात कोरोना संकटकाळातही पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेत्यांच्या राज्यपालांच्या भेटीगाठी सुरु असताना, तिकडे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा आहे. नाना पटोले यांच्या जागी आता पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरु आहेत. तर नाना पटोले यांना काँग्रेस प्रदेशाध्यपद सोपवलं जाण्याची चिन्हं आहेत.

विद्यमान विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे कालच दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार होते. मात्र काही कारणास्तव ही भेट होऊ शकलेली नाही. सध्या काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहे. मंत्रिपद, महाविकास आघाडीशी समन्वय आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद अशी तिहेरी जबाबदारी सांभाळताना बाळासाहेब थोरात यांची तारांबळ होत असल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे काँग्रेसमधील अनुभवी चेहरा असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे कोणतंही मंत्रीपद नाही, शिवाय पक्षातही महत्त्वाची जबाबदारी सध्यातरी नाही. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा करुन घेण्यासाठी काँग्रेसमध्ये या अंतर्गत घडामोडी सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळेच पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्षपद देऊन, आक्रमक नाना पटोले यांना थेट मैदानात उतरवून त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्याची चिन्हं आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here