शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह ट्विट, पुण्यात भाजपा नेत्याविरोधात तक्रार!

शिवराज्याभिषेक दिनी आक्षे-Aakshe on Shivrajyabhishek Dini

शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह ट्विट, पुण्यात भाजपा नेत्याविरोधात तक्रार!

शिवराज्याभिषेक दिनाची आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत पुण्यात दिल्ली येथील भाजपा नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आम आदमी पक्षाचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी याप्रकरणी पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. भाजपाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी गुरुवारी रात्री शिवराज्याभिषेक दिनासंबंधी एक ट्विट केले होते. यामध्ये त्यांनी शिवराज्याभिषेकाला हिंदू साम्राज्य दिवस असे संबोधले. त्यावर धनंजय शिंदे यांनी आक्षेप घेतला असून, शिंदे यांनी यासंदर्भात ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे.

तसेच संबंधित भाजपा नेत्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी ट्विटरवरही चांगलाच गदारोळ पहायला मिळाला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here