कोरोनाच्या संकटात ताकदीने मुख्यमंत्र्यांच्या मागे उभा राहणार ! – मंत्री आव्हाड

कोरोनाच्या-संकटात-ताकदीन-Corona-Crisis-Strength

कोरोनाच्या संकटात ताकदीने मुख्यमंत्र्यांच्या मागे उभा राहणार ! – मंत्री आव्हाड

सध्या महाराष्ट्रातच नाही तर देशात कोरोनाचे संकट अधिक गडद होत आहे. या संकटात आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मागे संपूर्ण ताकदीने उभे राहणार आहे, असे वक्तव्य गृहराज्य मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. ते काल नवी मुंबई महानगर पालिकेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते.

मुंबई पाठोपाठ नवी मुंबईत सुद्धा कोरोनाच्या रुग्णात झपाट्याने वाढ होत आहे. या संदर्भात नवी मुंबई महानगर पालिकेत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत येत्या आठवडाभरात नवी मुंबईकरांसाठी दोन नव्या कोरोना टेस्ट लॅब सुरु करणार असल्याची माहिती आव्हाड यांनी दिली. त्यासोबत ऑक्सिजन सिलेंडर, व्हेंटिलेटर, औषध पुरवठा वाढवण्याचे आदेशही पालिका प्रशासनाला दिले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here