कल्याण – डोंबिवली व अन्य भागातील कोरोना परिस्थितीचा आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा….

कल्याण – डोंबिवली व अन्य भागातील कोरोना परिस्थितीचा आदित्य ठाकरेंनी घेतला आढावा….

आज पर्यावरण मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कल्याण येथे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ विभागात कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला.

कल्याण - डोंबिवली व अन्य भा-Kalyan - Dombivali and other places
यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी त्यांच्या सूचना ठाकरेंसमोर मांडल्या. मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी उपस्थित सर्व महानगरपालिका आयुक्तांना धारावी येथे राबवलेल्या मॉडेलची माहिती दिली. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी कल्याण-डोंबिवली महानरपालिकेच्या आर्ट गॅलरी येथे बनत असलेल्या कोविड हॉस्पिटलची पाहणी केली. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी मुंबईमधील धारावी आणि वरळीमध्ये ज्या पद्धतीने विविध उपाययोजना करून तेथील रुग्णसंख्या आटोक्यात आणली, त्याचप्रमाणे याठिकाणी देखील कोरोनाच्या रुग्णांवर नियंत्रण ठेवता येईल, असे यावेळी ते म्हणाले.

कल्याण - डोंबिवली व अन्य भा-Kalyan - Dombivali and other places
यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, कल्याण डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे, कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त, नवी मुंबई महापालिका आयुक्त, भिवंडी महापालिका आयुक्त, उल्हासनगर महापालिका आयुक्त व अंबरनाथ नगर परिषदेचे अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here