माजी खासदार निरुपम यांची होणार पक्षातून हक्कलपट्टी ?

माजी खासदार निरुपम यांची-Former MP Nirupam

माजी खासदार निरुपम यांची होणार पक्षातून हक्कलपट्टी ?

राजस्थानमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर पक्षाच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या नेत्यांविरोधात आक्रमक भूमिका काँग्रेस पक्ष आता घेताना दिसत आहे. आता काँग्रेस पक्ष माजी खासदार तथा मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांना लवकरच काँग्रेस बाहेरचा रस्ता दाखवू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत झालेल्या माहितीनुसार सध्याचे काँग्रेस अध्यक्ष, माजी खासदार एकनाथ गायकवाड निरुपम यांच्या वर्तणुकीबद्दल एक अहवाल दिल्लीतील पक्ष अध्यक्षांकडे सुपूर्त करणार आहेत. हा रिपोर्ट सादर करूनच निरुपम यांची पक्षातून हकालपट्टी होऊ शकते. अलीकडे प्रवक्ते संजय झा यांची हकालपट्टी करण्यात आली होती.

काही दिवसांपूर्वी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना निरुपम म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार बनवण्याची गरज नव्हती असे माझे पहिल्यापासून मत आहे. आताही काँग्रेसचे सरकारमध्ये काही महत्व नाही. सर्व कामे शिवसेना आणि राष्ट्रवादी करत आहे, असा आरोप त्यांनी केला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here