संजय राऊतांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे ठाकरी शैलीत उत्तर ; मुलाखतीचा प्रोमो प्रदर्शित..

संजय राऊतांच्या प्रश्नां-Questions from Sanjay Raut

संजय राऊतांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे ठाकरी शैलीत उत्तर ; मुलाखतीचा प्रोमो प्रदर्शित..

सामानाचे कार्यकारी संपादक तथा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बेधडक मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीचा ट्रेलर संजय राऊत यांनी आपल्या ट्विटरवरून शेअर केलेला आहे. येत्या शनिवारी आणि रविवारी या दोन दिवसात ही मुलाखत दाखवण्यात येणार आहे.

या मुलाखतीत नेमकं काय दाखवण्यात येणार आहे, याची झलक प्रोमोमध्ये दिसून आली आहे. त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे. दरम्यान संजय राऊत यांनी मुलाखतीचा दुसरा प्रोमो शेअर केला असून, यामध्ये उद्धव ठाकरे गुंतवणूक, महाविकास आघाडी अशा मुद्द्यांवर बोलताना दिसत आहे.

पहिल्या प्रोमोमध्ये संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना पहिल्या सहा महिन्यांचा कार्यकाळ, समोर उभी राहिलेली संकटे अशा अनेकांवर प्रश्न विचारलेली बघायला मिळत आहेत. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात लष्कर बोलावण्याची वेळ आली होती का ? मुंबईच्या रस्त्यावर वडापाव कधी मिळणार ? तसंच मंत्रालयात कमी गेल्यावरून होणारे आरोप यासंबंधी प्रश्न विचारले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here