Skip to content Skip to footer

राज्याच्या राजकारणात ठाकरे-पवार असा नवा पॅटर्न ?

राज्याच्या राजकारणात ठाकरे-पवार असा नवा पॅटर्न ?

२०१९ च्या निवडणुकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला सत्तेपासून दूर सारत राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाबरोबर आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यामुळे १०५ आमदार निवडणून येऊन सुद्धा भाजपावर आपल्या चुकांमुळे विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली होती, असेच म्हटले जाते.

आता याच तीन पक्षांची आघाडी येणाऱ्या सर्व निवडणूकांमध्ये सोबत दिसून येणार आहे, अशी चर्चा जोर धरत आहे. यातच मंत्रिमंडळाच्या बैठकांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात पार पडली. या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास ही बैठक चालली. मात्र या चर्चेचा संदर्भ अजून सुद्धा समोर आलेला नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक नवी दिशा राज्याला देण्याबाबत यामध्ये चर्चा झाली, राज्यात यापुढे येणाऱ्या निवडणुका एकत्रित लढण्याची तयारी सध्या सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र निवडणुका लढवण्याची तयारी केली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Leave a comment

0.0/5