राजेश क्षीरसागर यांचा नितेश राणे यांच्यावर पलटवार !

राजेश क्षीरसागर यांचा नि-Rajesh Kshirsagar's Ni

राजेश क्षीरसागर यांचा नितेश राणे यांच्यावर पलटवार !

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार आता राज्य नियोजनचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आपल्या शैलीत घेतला होता. “चंद्रकांतदादा लक्षात ठेवा, मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट नारायण राणेंसारखा होतो. तसेच चंद्रकांत पाटील हे आंबा पडल्यासारखे अचानक मोठे झाले. पण मोठे झालेल्यांना पायदळी यायला वेळ लागत नाही”, असे त्यांनी राणे यांना सुनावले होते.

क्षीरसागरांच्या या टीकेला नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी प्रतिउत्तर दिले होते. आता पुन्हा एकदा राजेश क्षीरसागर यांनी राणे पिता-पुत्रांवर तोफ डागली आहे. “नितेश राणे तुम्हाला तर शिवसेनेनं मुख्यमंत्री पदापर्यंत मोठं केलं तरी तुम्ही मातोश्रीवर आणि शिवसेनेवर भुंकताय. कारण तुम्हाला भाजपाची बिस्किटे पाहिजे आहेत. मी तर एक कट्टर शिवसैनिक आहे, मातोश्री आणि शिवसेनेवर केलेली टीका खपवून घेणार नाही”, असे ट्विट राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here