मुख्यमंत्री ज्या सरकारच नेतृत्व करत आहेत – मंत्री आदित्य ठाकरे

मुख्यमंत्री ज्या सरकारच-Chief Minister whose government

मुख्यमंत्री ज्या सरकारच नेतृत्व करत आहेत – मंत्री आदित्य ठाकरे

पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. त्यासच त्यांच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये काम करत असल्याचा अभिमान असल्याचे सुद्धा बोलून दाखविले आहे. व्याघ्र संवर्धन आणि पर्यावरण रक्षणाचे महत्त्व असलेले मुख्यमंत्री ज्या सरकारचं नेतृत्व करताहेत, त्या सरकारसोबत काम करत असल्याचा मला अभिमान आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात सुरू असलेल्या मानवी हस्तक्षेपाची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मागच्या महिन्यात केंद्र सरकारला पत्र लिहिले. हाडाचे छायाचित्रकार असलेल्या उद्धव ठाकरे यांनी वनसंवर्धनासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

शाश्वत विकासावर महाविकास आघाडीच्या सरकारचा भर आहे. पर्यावरणाचे महत्त्व माहीत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारसोबत काम करत असल्याचा मला अभिमान वाटतो, असेही आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांनी लागोपाठ ट्विट करून मुख्यमंत्री ठाकरे व महाविकास आघाडी सरकारच्या कामाचे विशेष कौतुक केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here