Skip to content Skip to footer

मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्या व्यक्ती विरोधात युवासेनामार्फत नालासोपारा पोलीस स्थानकात तक्रार दाखल…!

मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्या व्यक्ती विरोधात युवासेनामार्फत नालासोपारा पोलीस स्थानकात तक्रार दाखल…!

कोरोनाच्या वाढत्या संसर्गात एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असताना दुसरीकडे मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या विरोधात बदनामीकारक वक्तव्य आणि टीका टिपण्णी सुनैना होले या ट्विटर अकाउंटवरून होताना दिसून येत आहे.

मागील अनेक दिवसापासून या अकाऊंटवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या फोटोचा दुरुपयोग बदनामीकारक मजकूर ट्विटरवरून प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.

आज याबाबत तुळींज पोलीस स्थानकात नालासोपारा युवासेना मार्फत विधानसभा अधिकारी रोशन चव्हाण यांनी स्थानकाचे वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षण यांची भेट घेऊन लवकरात लवकर सदर व्यक्तीवर कारवाही करण्याची यावी अशा आशयाचे पत्र दिले आहे.

Leave a comment

0.0/5