गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा धमकीचा फोन ?
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पुन्हा निनावी कॉल वरून धमकी दिल्याची बातमी समोर येत आहे. मुख्य म्हणजे शनिवारी आणि रविवारी सुद्धा अनिल देशमुख यांना धमकीचे कॉल आले होते. सदर समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने आपण कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा उजवा हात खालिद बोलत असल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच पुन्हा एकदा समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने अभिनेत्री कंगना रानौत हिच्या प्रकरणात लक्ष न घालण्याची धमकी दिली आहे. या संदर्भात मिळालेल्या माहतीनुसार मंगळवारी सकाळी ११:३४ वाजता स्थानिक निवासस्थानी टेलीफोनवर हा फोन वाजला. फोन करणाऱ्याला नाव विचारले असताना आपण दाऊद इब्राहिमचा राईट हँड खालीद बोलतोय, असे सांगण्यात आले. शिवाय दाऊदने नाव सांगून कंगणाच्या प्रकरणात जास्त लक्ष देऊ नका, असा निरोपही देण्यास सांगितला आहे, असे या व्यक्तीने फोनवर सांगितले.