“राज्याचे विरोधीपक्ष नेते बोलत आहे की बिहारचे प्रभारी ?” – जयंत पाटील
कंगना राणावतच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईनंतर कंगनाचे जुहुमध्ये असलेल्या ऑफीसवर मुंबई महापालिकेने हातोडा चालवला आहे. यामुळे कंगणा आणि शिवसेना यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. या कारवाईनंतर राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या कृतीमुळे महाराष्ट्र राज्याची देशभरात बदनामी झाली आहे, असे बोलून दाखविले होते. याच मुद्द्यांवर आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.
जयंत पाटील यांनी ट्विट करत फडणवीसांना प्रश्न विचारला आहे. “विषय महाराष्ट्राचा प्रतिक्रिया हिंदीत ? महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते बोलत आहेत की भाजपचे बिहार निवडणुक प्रभारी हे महाराष्ट्रातील जनतेला कळायला हवं?”, असा टोला त्यांनी लगावला आहे.
विषय महाराष्ट्राचा प्रतिक्रिया हिंदीत ?
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते बोलत आहेत की भाजपचे बिहार निवडणुक प्रभारी हे महाराष्ट्रातील जनतेला कळायला हवं ?#JustAsking@Dev_Fadnavis https://t.co/uu9WB6aLuV
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 9, 2020
या सुरक्षित शहराची, इथल्या पोलीस दलाची तुलना पाकिस्तानासोबत होणं हे अत्यंत निंदनीय आहे. अशी वक्तव्य म्हणजे फक्त प्रसिद्धीसाठी केलेला खटाटोप आहे. आमची माय मुंबई ही भेदभाव न करता सर्वांना कवेत घेणारी आहे. त्यामुळे मुंबईचा आणि राज्यातील सर्वोच्च पदांचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे, असे ही पुढे त्यांनी बोलून दाखविले.