मुख्यमंत्र्यांविरोधात टीका सहन करणार नाही – खासदार इम्तियाज जलील
सिनेभिनेत्री कंगना रानौत हिच्या पाली हिल स्थित मुंबईतील कार्यलयावर अनधिकृत बांधकाम प्रकरणी मनपाने बुलडोझर चालविला होता. या कारवाईनंतर कंगनाने मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला होता व त्यांच्यावर अपमानजनक टीका सुद्धा केली होती. या टिकेनंतर तिच्या विरोधात सर्वत्र संतप्त प्रतिसाद उमटताना दिसून येत होत्या.
त्यातच आता औरंगाबादचे खासदार इम्तीयाज जलील यांनी कंगनाच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. “शिवसेना आणि आमचा पक्ष आम्ही एकमेकांचे विरोधक आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माझेही मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात अरे-तुरेची भाषा सहन करणार नाही”, अशा शब्दात खासदार जलील यांनी कंगनाची विरोध केला आहे.