रोहित पवार म्हणतात, “ठाकरे सरकारवर संपूर्ण विश्वास आहे!!”
मराठा आरक्षणाला कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यात विरोधी पक्षाने हाच मुद्दा उपस्थित करत आघाडी सरकारला अडचणीत आणायचा प्रयत्न सुरु केला आहे. एकीकडे मुख्यमंत्री मंत्र्यांच्या बैठका घेऊन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे विरोधकांनी याविषयीचे राजकारण सुरु केले आहे. हाच मुद्धा पकडत आमदार रोहित पवारांनी आघाडी सरकार आणि न्यायालयावर संपूर्ण विश्वास असल्याचे बोलून दाखवले आहे.
या संदर्भात रोहित पवारांनी ट्विट केले आहे. “मराठा आरक्षण व केंद्र सरकारने खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी दिलेलं १०% आरक्षण ही दोन्ही प्रकरणं सर्वोच्च न्यायालयाने घटना पीठाकडे सोपवले. पण तसं करताना फक्त मराठा आरक्षणालाच स्थगिती दिली, हे धक्कादायक आहे. तरी महाविकास आघाडी सरकार व न्यायालयावर आपला पूर्ण विश्वास आहे.” असे ट्विट त्यांनी केले आहे.