Skip to content Skip to footer

चंद्रकांत पाटलांच्या टीकेला संजय राऊतांचे उत्तर..

चंद्रकांत पाटलांच्या टीकेला संजय राऊतांचे उत्तर..

मराठा आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरून सर्वत्र संतापाची लाट पसरलेली आहे. त्यातच पुन्हा विरोधी पक्षाने सरकारवर टीका केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही याचा ठपका ठाकरे सरकारवर ठेवत टीका केली होती.

मात्र मराठा आरक्षणासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर केलेल्या टीकेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. खासदार राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे.

संजय राऊत म्हणाले, “चंद्रकांत पाटील सध्या विरोधी पक्षामध्ये आहेत. विरोधी पक्षातील लोकं अशा प्रकारचे भन्नाट आरोप करू शकतात. पण गेल्या काही वर्षांपासून सत्तेतील प्रत्येक पक्ष मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी शर्थ करत आहे. दुसरं असं की अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वाची समिती काम करत आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यावर काल निवेदन केलं आहे”.

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, ‘या विषयावर मी जाहीरपणे बोलणार नाही, कारण मला तो अधिकार नाही. एकनाथ शिंदे त्या समितीवर आहेत. शरद पवार यांनीही दिल्लीत त्यावर भूमिका मांडली आहे. त्यामुळे कोणताही नवा वाद निर्माण होईल असं मी कोणतंही वक्तव्य करणार नाही. या समाजाला, बहुजन समाजाचा महत्त्वाचा घटक असलेल्या समाजाच्या मागण्या मान्य व्हाव्यात, या मताचा मी आहे’, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली.

Leave a comment

0.0/5