Skip to content Skip to footer

भाजपा खासदाराची माजी सैनिकाला मारहाण ; देशमुखांचे चौकशीचे आदेश.

भाजपा खासदाराची माजी सैनिकाला मारहाण ; देशमुखांचे चौकशीचे आदेश.

भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी चार वर्षांपूर्वी माजी सैनिकाला मारहाण केल्याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता भाजपाच्या माजी खासदारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबतची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून दिली आहे. “२०१६ साली भाजपचे तेव्हाचे आमदार व आताचे खासदार उन्मेष पाटील व इतरांनी माजी सैनिक सोनू महाजन यांच्यावर हल्ला केला होता. तेव्हाच्या भाजप सरकारने महाजन यांना न्याय दिला नाही. यासंदर्भात मला मिळालेल्या अनेक निवेदनांनुसार पोलिसांना पाटील यांची या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत”, असे ट्विट देशमुख यांनी केले आहे.

सदर प्रकरण हे २०१६ साली घडले होते. मात्र तेव्हा भाजपा सरकार असल्याकारणामुळे या घटनेचे गांभीर्य घेण्यात आले नव्हते. त्यानंतर उच्च नायल्याने २०१९ मध्ये एफआयआर देण्याचे आदेश दिले होते. मात्र सत्ता असल्याकारणामुळे पुढेच कोणतेही कारवाई करण्यात आली नव्हती, असे देखील देशमुख यांनी सांगितले आहे. मात्र कांदिवली येथे माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी आंदोलन करणाऱ्या भाजपा नेत्याची चांगलीच कोनी झाल्याचे दिसून येत आहे.

Leave a comment

0.0/5