राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांची फडणवीसांवर टीका
माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी माझी जात ब्राम्हण असल्यामुळे मला टार्गेट केले जात आहे. अशी टीका विरोधकांवर केली होती. या वक्तव्यावरून सर्व स्थरातून फडणवीसांवर टीका होताना दिसून आली होती. आता फडणवीसांच्या या वक्त्यव्याचा राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
गोटे बोलताना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांचा सारखा लबाड माणून माझ्या संपूर्ण आयुष्यात पहिला नाही. महाराष्ट्राचे दुर्दैव्य आहे की ते पाच वर्ष मुख्यमंत्री होते. मी उदारणासह तारखासह सिद्ध करून देईन. पुढे मराठा आरक्षणाबद्दल केलेल्या वक्त्यव्यावर बोलताना गोरे म्हणाले की, हे त्याच्या बोलबुद्धीचे आणि हलकटपणाचे लक्षण आहे. महाराष्ट्राने कधीही जात पहिली नाही असे बोलून दाखविले होते.
सेनापती बापट असतील ,आचार्य अत्रे, श्रीपाद डांगे, नानासाहेब गोरे असतील या सर्वांना महाराष्ट्राने स्वीकारले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली लढाया जिंकल्या, एवढ्या शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी जोशींच्या शब्दाखातीर छातीवर गोळ्या झेलल्या आणि हा इतका हलकट माणूस अमुक तमुक जातीतून आलो आहे म्हणून असे अमुक तमुक बोलत आहे. पुढे बोलताना त्यांनी संघामध्ये जात शिकवतात का? असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला होता.