Skip to content Skip to footer

कंगनाच्या दहशतवादी वक्तव्यावर सेनेचा सामनातून भाजपाला टोला..

कंगनाच्या दहशतवादी वक्तव्यावर सेनेचा सामनातून भाजपाला टोला..

सिनेअभिनेत्री कंगना रणावत हिने काल कृषी विधेयकाची बाजू घेताना मोदी सरकारची प्रशंसा करत विधेयकाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा ‘दहशतवादी’ असा उल्लेख केला होता. तिच्या या टिप्पणीमुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी तिच्या विरोधात संताप व्यक्त केला होता. तर आजच्या सामानातून तिच्या या वक्तव्याचा समाचार घेत भाजपाला जोरदार टोला लगावला आहे.

आपल्या हक्कांसाठी लढणारे शेतकरी ‘आतंकवादी’ किंवा ‘दहशतवादी’ आहेत, असा कांगावा कोणी करीत असेल तर ती बेइमानीच आहे. पण एका नटीच्या बोलण्यावर नागोबासारखे डुलणारे राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या अवमानावर गप्प बसले आहेत, असे म्हंटले आहे. भाजपावर टीका केली आहे. ‘बाबर’ सेनेनेसुद्धा इतका जुलूम केला नसता. पण हा देश सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना भाजप समर्थक मोदीभक्त ‘नटी’ने आतंकवादी ठरवले, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

आंदोलन करणारे शेतकरी अतिरेकी असतील तर त्या समस्त अतिरेक्यांसाठी सरकारने नवे कृषिविधेयक मंजूर केले असे मानायचे काय?, असा सवालही शिवसेनेनं केला आहे. शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून या प्रकरणावर टीका केली आहे.

Leave a comment

0.0/5