खासदार छत्रपती संभाजीराजेंनी केले ठाकरे सरकारच्या निर्णयाचे स्वागत
सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला स्थागिती दिल्यानंतर मराठा समाजामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यात अनेक ठिकाणी मराठा मोर्च्याने हिंसक रूप धारण केले होते. त्यातच राज्यातील विविध जिल्ह्यात मराठा आरक्षांणावरील स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने योग्य ती पाऊले उचलावी अशी मागणी करण्यात येत होती.
आता या मराठा आरक्षणाला नागरिकांसह अनेक लोकप्रतिसनिधीनी सुद्धा छत्रपती संभाजीराजेंना भेटून आपला पाठिंबा दर्शवला होता. त्यातच मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामुळे आता मराठा समाजाला काहीसा दिलासा मिळाला असला तरी आरक्षण कायम होणे महत्वाचे आहे.
यावर आता राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजेनी ठाकरे सरकारच्या भूमिकेचे स्वागत केले असून मराठा आरक्षण कायम होईपर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी म्हणले आहे.” राज्य सरकारने नोकरभरती आणि शैक्षणिक प्रवेशावर न्यायालयाने लावलेली स्थगिती उठवण्यासाठी विनंती अर्ज केल्याचे समजते. आरक्षण टिकवण्यासाठी सरकार जर प्रामाणिक प्रयत्न करत असेल तर, आम्ही त्यांना नक्की सहकार्य करू. आंदोलनाची दिशा ठरलेली आहेच. असे त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.