महाराष्ट्राबद्दल बोलणाऱ्यांचे पुढचे पाऊल राजकारणात पडते- राऊत
सुशांत राजपूत प्रकरणी मुंबई शहर आणि मुंबई पोलिसांवर आरोप करणारे बेहरचे पॉलसा महासंचालक लवकरच आपल्या पदाचा राजीनामा देत येणाऱ्या बिहार निवडणुकीतुन राजकीय प्रवासाला सुरवात करणार आहे. हाच मुद्धा पकडत आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
पांडे हे राजकीय पक्षात जातील हे अपेक्षितच होते असे त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलून दाखविले आहे. सुशांत प्रकरणात बिहार पोलीस महासंचालक पांडे यांनी मुंबईवर बेछुड आरोप लावले होते. त्यातच बिहार निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी घेतलेली सेवानिवृत्ती चांगलीच चर्चेत आलेली आहे. या प्रकरणावर आता खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.