‘हम ना भुले है ! ना भुले देंगे’ टाइम्स नाऊ वृत्त वहिनीच्या कॅम्पेनिंगला वरुण सरदेसाईचा टोला
सिनेअभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी दोनच दिवसांपूर्वी एम्सच्या डॉक्टरांनी अहवाल सीबीआयकडे सुपूर्त केला होता. या अहवालामध्ये सुशांत सिंह राजपूतची हत्या नसून त्याने आत्महत्याच केली आहे, असे एम्सच्या डॉक्टरांनी सीबीआयला दिलेल्या अहवाल म्हटले आहे. या आलेल्या अहवालावरून सुशांतच्या हत्येचा कांगावा करणाऱ्या भाजपा नेत्यांवर आणि समर्थकांवर जोरदार टीका होत आहे.
Waah @TimesNow waah!
Full 180 U Turn??But dont you worry all the false and cheap campaign that you carried out for months and months,
Hum na Bhule hai, Na Bhulne Denge.. pic.twitter.com/Qb1pCgMOJg— Varun Sardesai (@SardesaiVarun) October 4, 2020
याच पार्श्वभूमीवर युवासेना सचिव वरुण सरदेसही यांनी ट्विट करत टोला हाणला आहे. सरदेसाई आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, आपल्या मुंबईची, आपल्या पोलिसांची, आपल्या डॉक्टरांची आणि आपल्या सरकारची बदनामी करणारे महाराष्ट्रद्रोही आता तोंड कुठे लपवणार ?? मुंबई पोलीस संघात होते तेच सिद्ध झाले ! खोटे आणि फालतू आरोप करणारे ही महाराष्ट्रद्रोही गॅंग आता आपल्या राज्याची जाहीर माफी मागणार का? ? असे ट्विट सरदेसाई यांनी केले आहे.
आपल्या मुंबईची, आपल्या पोलिसांची, आपल्या डॉक्टरांची आणि आपल्या सरकार ची बदनामी करणारे महाराष्ट्रद्रोही आता तोंड कुठे लपवणार ??
मुंबई पोलीस सांगत होते तेच सिद्ध झालं!
खोटे आणि फालतू आरोप करणारे ही महाराष्ट्रद्रोही गॅंग आता आपल्या राज्याची जाहीर माफी मागणार का ?? https://t.co/itm5Gt62Z2
— Varun Sardesai (@SardesaiVarun) October 3, 2020
त्यातच ‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तसमूहाने सुशांत प्रकरणावरून घेतलेल्या युटर्न वरून सरदेसाई यांनी यांनी टाइम्स नाऊ या वृत्त वाहिनींच्या दोन वेगवेगळ्या प्रति