Skip to content Skip to footer

शिवसेना पक्षाचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे निधन.

शिवसेना पक्षाचे माजी आमदार सुरेश गोरे यांचे निधन.

सध्या राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी-जास्त प्रमाणात वाढत असल्याचे दिसत आहे. त्यात सर्व सामान्य जनतेबरोबर राजकीय नेत्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यात आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. तसेच आजी-माजी नगरसेवकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यात आता पुणे जिल्ह्याचे माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे.

सुरेश गोरे हे पुणे जिल्ह्यातील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार होते.
कोरोनाची लागण झाल्यावर त्यांना पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवल्याची बातमी हाती आली आहे.

त्यांच्या या बातमीमुळे राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. गेले २५ दिवस त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचं समजत असून, वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

Leave a comment

0.0/5