खासदार निलेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल
माजी खासदार निलेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून द्वेषभावना निर्माण होईल, अशी पोस्ट शेअर केली होती. बीड जिल्ह्यातील केज येथील पोलीस स्थानकात राणे विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
प्रकरण असे की, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा, माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात राणे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत खालच्या पातळीची टीका केली होती. ही पोस्ट निलेश राणे यांनी पाठविल्याचे वंचित बहुजन आघाडीचे केज तालुक्याचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब मस्के यांना मोबाइल पाहताना आढळून आले होते. त्यामुळे मस्के यांनी राणे विरोधात केज पोलीस स्थनाकात तक्रार दाखल केली आहे.