Skip to content Skip to footer

ड्रग्ज प्रकरणावरून आजच्या सामनातून भाजपाला टोला


ड्रग्ज प्रकरणावरून आजच्या सामनातून भाजपाला टोला

उत्तर प्रदेशात नवी बॉलिवूडनगरी उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी यांनी केल्यानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. बॉलिवूड हलवणाऱ्यांच्या प्रयत्नांवर ‘सामना’च्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. तसेच भाजप गोटातील अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्यावरही निशाणा साधला आहे.

बॉलिवूडवर नशेबाजीचा आरोप करायचा, रोज तोच खोटारडेपणा मोठ्याने बोलून समोर आणायचा, पण पुराव्यांच्या नावाने ठणाणा. पण आता काय घडले? विवेक ओबेरॉयच्या घरावर बंगळुरूच्या पोलिसांनी छापा टाकला. विवेकच्या बायकोचा भाऊ हा बंगळुरू ड्रग्ज प्रकरणातला आरोपी आहे.

विवेक महाशय हे भाजप गटातले म्हणून ओळखले जातात आणि पडद्यावर नरेंद्र मोदी यांची भूमिका विवेक ओबेरॉयने साकारली होती. या सर्व ‘ड्रग्ज’ प्रकरणाशी विवेक ओबेरॉयचा संबंध असेल किंवा आहे असे आम्ही म्हणणार नाही; पण कुठले धागे कुठे पोहोचतील याचा सध्या भरवसा नाही, असा चिमटा शिवसेनेने भाजपला काढला आहे.

यानिमित्ताने बॉलिवूडला हादरे देऊन हा संपूर्ण उद्योग उद्ध्वस्त करण्याचा ‘डाव’ गंभीर आहे. बॉलिवूडला बदनाम करायचे, खच्चीकरण करायचे आणि हा उद्योग इथून हलवायचा असे मनसुबे काहींनी रचले असतीलच. एका परीने महाराष्ट्राची, मुंबईची ओळख संपवायची असे काहीतरी बंद पडलेल्या पडद्यामागून सुरू आहे. मुळात कोणी कितीही आपटली तरी मुंबईतील बॉलिवूडच्या केसाला धक्का लागणार नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.

Leave a comment

0.0/5