मोदी सरकार परदेशातील नाही, मदत मागितली तर गैर काय ? – मुख्यमंत्री
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एक दिवसीय सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी मुख्यत्र्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला होता.
राज्यात अतिवृष्टी झाली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने केंद्राकडे मदत मागितली तर त्यात बिघडलं कुठे? केंद्रातले सरकार हे देशाचे सरकार आहे परदेशातील सरकार नाही, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.
पुढे बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, संकटाच्या परिस्थितीत सगळ्यांनीच एकत्र आले पाहिजे. राजकारणाचा चिखल एकमेकांवर फेकायला नको, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटले. शुक्रवारी पंतप्रधानांचा मला फोन आला होता. त्यांनी आवश्यक ती मदत करू असे सांगितले आहे. त्यामुळे केंद्राकडे मदत मागण्यात काही गैर नाही, असे उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत बोलून दाखविले होते.
दरम्यान सध्या पाऊस खूप विचित्र पडतो आहे. एका ७२ वर्षाच्या शेतकऱ्याने सांगितले की, त्याच्या संपूर्ण आयुष्यात त्याने असा पाऊस पाहिलेला नाही. आजच मला परिस्थिती कळली असं नाही. पावसाला सुरुवात झाल्यापासून यंत्रणेच्या संपर्कात आहे. नुकसान किती होतंय, पाऊस किती पडतोय याची माहिती सातत्याने