Skip to content Skip to footer

अजित पवारांसोबत पहाटे शपथ घेतली तर नैतिक आणि आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर अनैतिक – खडसे

अजित पवारांसोबत पहाटे शपथ घेतली तर नैतिक आणि आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर अनैतिक – खडसे

भाजपचे जेष्ठ नेते, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यानंतर खडसे यांनी मुक्ताईनगर येथे पत्रकार माध्यमांशी संवाद साधताना, आपण देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे पक्ष सोडत असल्याची टीका केली होती. तसेच शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे राष्ट्र्वादीत प्रवेश करणार आहे.

यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी टीव्ही९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. एकनाथ खडसे यांनी अजित पवार यांच्यासोबत पहाटे शपथ घेतली तर नैतिक आणि आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर अनैतिक हा कोणता न्याय आहे अशी विचारणा केली.

पुढे बोलताना खडसे म्हणाले की, विधानसभेनंतर सेनापक्षा सोबत युती केली असती तर सरकारमध्ये आलो असतो. राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्यापेक्षा शिवसेनेसोबत युती केली असती तर कदाचित दोघे राज्यात आले असते. अजित पवार यांच्यासोबत पहाटे शपथ घेतली तर नैतिक आणि आम्ही राष्ट्रवादीसोबत गेलो तर अनैतिक हा कोणता न्याय आहे,
आधी भाजपात सर्वशी सल्लामसलत करून निर्णय घेण्यात यायचे. पण आता भाजपा ही व्यक्तिगत आहे. एक व्यतीने निर्णय घ्यायचा आणि सर्वांनी मान्य करायचा असे म्हणत खडसेंनी फडणवीसांकडे बोट दाखविले होते.

देवेंद्र फडणवीस यांनी खडसेंच्या टीकेला उत्तर देताना कोणाला तरी व्हिलन ठरवावं लागतं, त्यांनी मला ठरवलं असं म्हटलं आहे. त्यांच्या या आरोपाला उत्तर देताना खडसेंनी “मी फडणवीसांना व्हिलन ठरवलं नाही असं स्पष्ट केलं. “आयुष्यभर ज्यांनी चारित्र्य जपलं, त्यांच्यावर तुम्ही असे आरोप करता,” अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.

Leave a comment

0.0/5