Skip to content Skip to footer

खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश !

खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात प्रवेश !

भारतीय जनता पक्षाचे माजी वरिष्ठ नेते, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी सुद्धा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला.

भारतीय जनता पक्षाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसे गुरुवारी आपल्या परिवारासह हेलिकॉप्टरने मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. यावेळी रोहिणी खडसे यांनी आपण सुद्धा पक्षातून बाहेर पडणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांनी एका हातात घड्याळ असलेला फोटो सोशल मीडियावर शेअर करत भाजपा पक्ष सोडणार असल्याचा सूचक इशाराच दिला होता.

आज एकनाथ खडसे यांनी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आपल्या मुलीसह राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्या सोबत जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सुद्धा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले.

Leave a comment

0.0/5