Skip to content Skip to footer

चक्क भाजपा नेत्याकडून शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुलना ?


भाजपा नेत्याकडून शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुलना ?

भाजपचे जेष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला होता. खडसे यांच्या या पक्षप्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाला उत्तर महाराष्ट्रात मोठा फटका बसला आहे. त्यात आता भाजपा नेत्यांची सुद्धा भाषा बदललेली असल्याचे पाहायला मिळत आहे.

त्यातच आता नाथाभाऊंच्या पक्षप्रवेशाने राजकीय वारे बदलाच्या दिशेने वाहतील अशी दाट शक्यता व्यक्त होत आहे. भाजपच्याच नेत्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची तुलना आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केली आहे. उदाहरण कोणतेही असो, मात्र भाजपमधील नेत्यांच्या मनातला ओव्हर कॉन्फिडन्स आता काहीसा ढासळला असल्याचे दिसून येत आहे.

शरद पवार या नावाचे वलय आजही कायम आहे. राज्याच्याच नाही तर राष्ट्रीय राजकारणातही शरद पवारांच्या नावाचा उल्लेख आवर्जून होतोच हे आजवरचे निदर्शन आहे. त्यातच आता, शरद पवारांवर विश्वास ठेवायचा की मोदींवर हे आता जनतेनेच ठरवावे, असे वक्तव्य खासदार सुजय विखे पाटील यांनी केले आहे. ‘भविष्यकाळात कोण खरे ठरते, हे निवडणुकीपूर्वी जनतेसमोर आल्याशिवाय राहणार नाही.’ असा दावाही त्यांनी केला आहे.

Leave a comment

0.0/5