आले अंगावर, सोडले वाऱ्यावर ; भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या परिस्थितीवर युवासेना सचिव वरुण सरदेसाईंचा टोला.
भाजपा आयटी सेलचे मुख्य सदस्य समित ठक्कर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र, राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विषयी प्रक्षोभक आणि निंदनीय ट्विट केल्यानंतर शिवसैनिकांमध्ये प्रचंड आक्रोश पाहायला मिळाला होता.
नागपूर येथील एका कट्टर शिवसैनिकाने ठक्कर यांच्या विरुद्ध तक्रार देखील नोंदवली होती. त्यानंतर ठक्कर यांना अटक करण्यासाठी मुंबई आणि नागपूर पोलिसांनी संयुक्त रित्या त्यांच्यावर अटकेची कारवाई पूर्ण केली. तसेच मुंबई कोर्टाने त्यांना हजर राहण्याचे तसेच त्यांचा लॅपटॉप आणि मोबाईल निरिक्षणासाठी ताब्यात घेण्याचे आदेश जारी केले होते.
ही आहे भाजप ची use and throw policy.
'आले अंगावर, सोडले वाऱ्यावर' https://t.co/3ROaLEP3Id
— Varun Sardesai (@SardesaiVarun) October 26, 2020
परंतु ही सर्व कारवाई झाल्यानंतर सर्व स्तरातून भाजपवर टीकेची झोड उठली होती. ती झोड कमी करण्यासाठी भाजप महाराष्ट्राचे सुरेश नखुआ यांनी ठक्कर हे भाजपचे सदस्य नाही नाही ते भाजपा आयटी सेलचे सदस्य आहेत, असे ट्विट केले.
त्यामुळे ठक्कर यांच्यावर आलेल्या संकटात त्यांनी ज्या भाजपसाठी काम केले त्यांना वाऱ्यावर सोडल्याची चिन्हे दिसत आहेत. हाच मुद्दा पकडत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी नाखुआ यांच्या ट्विटला रिट्विट करत ‘हीच भाजपची पॉलिसी आहे. आधी वापरा आणि मग फेकून द्या’, असा टोला लगावला आहे. तसेच आले अंगावर, सोडले वाऱ्यावर’, असे म्हणत भाजपच्या पॉलिसीवर टीका केली आहे.