राणे यांना शिवसैनिक योग्य वेळी सडेतोड उत्तर देतील! – अशोक चव्हाण
माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी सोमवारी भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीची टीका केली होती. या टिकेनंतर राज्यात शिवसैनिकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना दिसत होत्या. यावेळी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी औरंगाबाद येथे राज्याचे मंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आले होते. त्यांना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेबद्दल विचारण्यात आले होते. त्यावर “नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला शिवसैनिकच योग्य वेळी उत्तर देलीत,” अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली होती.
नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत विचारले असता अशोक चव्हाण म्हणाले की, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याविषयात मला काही बोलायचे नाही. पण त्यांनी केलेल्या विधानांवर कोणी प्रतिक्रिया देत नाही, याचा अर्थ तुम्हीच समजून घ्या. त्यांची किंमत काय आहे. विषय शिवसेनेचा आहे. शिवसैनिकच योग्यवेळी त्यांना उत्तर देतील कारण ते पूर्वश्रमीचे शिवसैनिक आहेत, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली होती.