महाजनांच्या बालेकिल्ल्यात खडसेंनी लगावला सुरूंग, भाजपचे अनेक कार्यक्रते राष्ट्र्वादीत सामील
भाजपचे जेष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला होता. तसेच पक्ष प्रवेशानंतर खडसे यांनी भाजपाला खुलं आवाहन दिले होते. त्यातच जामनेर भाजपचे नेते तथा माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादीत अलिकडेच दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सुरुंग लावला आहे.
जामनेर विधानसभा मतदारसंघातील १७५ भाजपमधील कार्यकर्त्यांचा खडसे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेशच केला आहे. जामनेर विधानसभा क्षेत्रातील देवपिंप्री आणि नेरी येथील १७५ भाजप कार्यकर्त्यांनी माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या उपस्थिती आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला .
प्रवेश करणाऱ्यामध्ये सर्व कार्यकर्ते हे भाजपामध्ये काम करत होते. त्यातले काही पदाधिकारी आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली.