Skip to content Skip to footer

एका नौटंक्यासाठी छाती बडवणे बंद करा! ; सामनातून भाजपाला टोला


एका नौटंक्यासाठी छाती बडवणे बंद करा! ; सामनातून भाजपाला टोला

आर रिपब्लिक वृत्तवाहिनीचे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी अलिबाग पोलिसांनी त्यांच्या वरळी येथील घरातून अटक केली. या अटकेनंतर राज्यातील तसेच केंद्रातील भाजपा नेत्यांनी विरोध दर्शवत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती. आता विरोधकांच्या या टीकेचा आजच्या ‘सामना’च्या अग्रलेखातून खरपूस समाचार घेण्यात आला आहे.

‘अर्णब गोस्वामी यांस एका अत्यंत खासगी प्रकरणात अटक झाली आहे. त्यांच्या अटकेचा राजकारणाशी, पत्रकारितेशी संबंध नाही. गोस्वामी म्हणजे कुणी टिळक-आगरकर नाहीत. त्यामुळं एका नौटंक्यासाठी रडणे, छाती बडवणे बंद करा. तरच महाराष्ट्रात कायद्याची बूज राहील’, अशी टीका या अग्रलेखातून केली आहे.

अर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर मुंबईपासून दिल्लीपर्यंतचे भाजपचे नेते ठाकरे सरकारवर अक्षरश: तुटून पडले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरचा हल्ला आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर, सरकारविरोधात मोर्चे काढा, उपोषणं करा, आंदोलनं करा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. भाजपच्या या भूमिकेवर ‘सामना’च्या अग्रलेखातून आसूड ओढण्यात आले आहेत.

Leave a comment

0.0/5