अमित शहांनी माहिती घेऊन बोलावे! ; अरविंद सावंत यांचा टोला.
आर रिपब्लिकचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी त्यांच्या राहत्या घरातून पनवेल पोलिसांनी अटक केली होती. या अटकेनंतर राज्यात विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली होती. तसेच दिल्लीतील मोदी सरकारच्या मंत्र्यांनी या अटकेचा विरोध केला होता. यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही घटना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात लावलेल्या आणीबाणीसारखीच आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती.
आता शाह यांच्या या टीकेचा शिवसेना खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी खरपूस समाचार घेतला आहे. “अर्णब गोस्वामींच्या अटकेचा पत्रकारितेशी काय संबंध? एका खासगी व्यवसायिकेचे पैसे बुडवल्यानं आणि त्याने आत्महत्या केल्याने गोस्वामी यांना अटक झाली आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी माहिती घेऊन बोलावे, असा टोला सावंत यांनी शाह यांना लगावला होता.