Skip to content Skip to footer

राज्य सरकारच्या पत्रात लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी नव्हती

राज्य सरकारच्या पत्रात लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी नव्हती

महिलांसाठी लोकल सुरु केल्यानंतर सर्वसामान्यांसाठी देखील सुरु करावी अशी मागणी ठाकरे सरकारने केल्याचे सांगण्यात येत होते. मात्र अशी मागणी राज्य सरकारने न केल्याचा दावा मध्य रेल्वे अधिकाऱ्यांनी केला आहे.
२८ तारखेला राज्य सरकारने रेल्वेला जे पत्र पाठवले त्यात फक्त लोकल सुरू करण्यासंदर्भात माहिती मागवली होती. पण लोकल सुरु करा असा कुठेही उल्लेख नव्हता असे रेल्वेतर्फे स्पष्ट करण्यात आले.

राज्य सरकारच्या मागणीनुसार आम्ही जी माहिती द्यायची होती ती सर्व दिली आहे.आम्हाला सर्व सामान्यांसाठी लोकल सुरु करण्यात अडचण नसल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले. आहे. आम्हाला राज्य सरकार सोबत बैठक हवी आहे ती मात्र बैठक राज्य सरकार कडून घेतली जात नसल्याचेही सुतार यांनी म्हंटले आहे.

Leave a comment

0.0/5