Skip to content Skip to footer

अन्वय नाईक यांच्या पत्नी, मुलीचे ‘ते’ फोटो वायरल, वरुण सरदेसाई भडकले

अन्वय नाईक यांच्या पत्नी, मुलीचे ‘ते’ फोटो वायरल, वरुण सरदेसाई भडकले

अन्वय नाईक यांच्या आत्महत्ये प्रकरणी आर रिपब्लिकचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि त्यांच्या सोबत दोघा जणांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मात्र गोस्वामी यांच्या अटकेवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. अन्वय नाईक यांनी हत्या का केली याविषयी आवाज उठवणाऱ्या पत्नी आणि मुलीबद्दल वेगवेगळी चर्चा रंगताना दिसून येत आहे.

त्यातच नाईक यांच्या पत्नी आणि मुलीच्या खाजगी आयुष्यातील फोटो भाजपच्या आयटी सेलने प्रसिद्ध करत आक्षेपार्ह भाषा वापरली आहे. यावर युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी संताप व्यक्त करत टीका केली आहे.

सतीश निकम नावाच्या व्यक्तीच्या अकाउंट वरून आज्ञा अन्वय नाईक यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये अन्वय नाईक यांच्या पत्नीचे फोटो सुद्धा दिसून येत आहे. तसेच या ट्विटमध्ये नाईक कुटुंबियांकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवर सुद्धा टीका केली आहे.

या ट्विटवर युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी आक्षेप घेत, भाजपचे आयटी सेल काहीही पसरवत आहे. मराठी माणसाच्या मागे उभे राहायचे सोडून हे असले सुचते कसे ? असा सवाल करत निषेध व्यक्त केला आहे. तसेच दुसऱ्या ट्विट मध्ये त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाराष्ट्र सायबर सेल यांना टॅग करत सदर व्यक्तीवर कडक कारवाही करण्याची मागणी केली आहे.

Leave a comment

0.0/5