Skip to content Skip to footer

पत्रकारांना जांभेकरांचे वंशज म्हणून संबोधल्यामुळे पाटील यांनी पत्रकारांचा रोष घेतला ओढावून?

पत्रकारांना जांभेकरांचे वंशज म्हणून संबोधल्यामुळे पाटील यांनी पत्रकारांचा रोष घेतला ओढावून?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज औरंगाबादेतील पत्रकार परिषदेत पत्रकारांना जांभेकरांचे वंशज संबोधल्यामुळे पत्रकार चांगलेच पाटलांवर चिडले होते. त्यामुळे भडकलेल्या पत्रकांराचा रोष पाहून चंद्रकांत पाटलांना दिलगिरी व्यक्त करत सारवासारव केल्याचे दिसून आले होते.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. या मतदारसंघातून भाजपकडून प्रवीण घुगे हे इच्छूक होते. परंतु घुगे हे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या जवळचे असल्यामुळे त्यांना डावलण्यात आले आहे, असा प्रश्न पत्रकारांनी चंद्रकांत पाटलांना पत्रकार परिषदेत विचारला.

यावर भाष्य करताना पाटील यांनी पत्रकारांची जांभेकरांच्या वंशजाशी तुलना केली होती. तसेच आहे तशी बातमी द्या असा खोचक टोला सुद्धा पत्रकारांना लगावला होता. चंद्रकांत पाटलांनी आपल्याला जांभेकरांचे वंशज संबोधल्याची बाब पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या पत्रकारांना खटकली आणि पत्रकार चंद्रकांत पाटलांवर भडकले. त्यांनी आमचा आणि जांभेकरांचा संबंध काय? आम्ही त्यांचे वंशज कसे काय?, असे म्हणत चंद्रकांत पाटलांना धारेवर धरले.

पत्रकारांचा रोष पाहून चंद्रकांत पाटलांनी मग सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. माझे म्हणणे एवढेच आहे की, बातमी जशी आहे तशी छापणे हे पत्रकारांचे काम आहे. पण थोडेसे विडंबन होतेय. गैरसमज नसावा, तुम्ही जांभेकरांचे वंशज म्हणजे तुम्ही फिजिकल वंशज आहात, असे मला म्हणायचे नाही, असे सांगत चंद्रकांत पाटलांनी सारवासारव केली.

Leave a comment

0.0/5