Skip to content Skip to footer

शरद पवार आणि मंत्री आदित्य ठाकरे कार्यक्रमानिमित्त पुण्यात एकत्र

शरद पवार आणि मंत्री आदित्य ठाकरे कार्यक्रमानिमित्त पुण्यात एकत्र

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे मंगळवारी अमनोरा पार्क येथे छत्रभुज नर्सरी आंतरराष्ट्रीय स्कूलच्या भूमिपूजन समारंभास एकत्र उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शरद पवारांच्या निमित्ताने मला एका विद्यापीठाच्या बाजूला बसण्याची संधी मिळाली, असे म्हणत आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. आठ महिन्यांनंतर कोविड सेंटर वगळता पहिल्यांदाच एखाद्या उद्घाटनाला आपण उपस्थित असल्याचंही यावेळी मंत्री ठाकरे यांनी सांगितले.

‘सध्याच्या आव्हानात्मक काळात मागील आठ महिन्यात पहिल्यांदाच मी कोविड सेंटर सोडून इतर कोणत्या वेगळ्या गोष्टीच्या उद्घाटनाला आलो आहे. त्यातही तुम्ही तर आज मला एका विद्यापीठाच्या बाजूला बसवलं आहे ते म्हणजे शरद पवार. त्यांना ज्यावेळी भेटतो, तेव्हा प्रत्येक वेळी काही ना काही शिकण्यास मिळतं’ असे ट्विट मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

Leave a comment

0.0/5