‘कराची स्वीट्स’ ती भूमिका शिवसेना पक्षाची नाही! – संजय राऊत

कराची-स्वीट्स-ती-भूमिका-श-Karachi-Sweets-She-Role-Sh
ads

‘कराची स्वीट्स’ ती भूमिका शिवसेना पक्षाची नाही! – संजय राऊत

मुंबई येथे ‘कराची स्विट्स’ या पाकिस्तानची राजधानी असलेल्या कराची नावाने मिठाईचे दुकान चालवणाऱ्या दुकान मालकाला शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षाने दणका दिला आहे. तर या मिठाई दुकानाच्या व्यवस्थापकाला शिवसैनिक नितीन नांदगावकर यांनी दुकानदाराला भेट देऊन सदर नाव बदलण्याची विनंती केली आहे. तसेच नाव बदलण्यासाठी काही मदत लागल्यास मदतीचे सुद्धा आश्वासन दिले आहे. आता यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले आहे.

बेकरीचे नाव बदलण्याची भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे. ‘कराची बेकरी आणि कराची स्वीटस ६० वर्षापासून मुंबई सह देशात आहेत. त्यांचा पाकिस्तानशी सबंध नाही. निर्वासित सिंधी पंजाबी बांधवांनी कष्टातून ऊभा केलेला हा व्यवसाय आहे. कराची बेकरीचे नाव बदला ही मागणी निरर्थक आहे. ही शिवसेनेची अधिकृत भुमिका नाही’, असा खुलासा सुद्धा संजय राऊत यांनी केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here