Skip to content Skip to footer

“ती पहाट नव्हती, तो अंधःकारच होता!”, पहाटेच्या शपथविधीवर राऊतांचे सूचक वक्तव्य

“ती पहाट नव्हती, तो अंधःकारच होता!”, पहाटेच्या शपथविधीवर राऊतांचे सूचक वक्तव्य

फडणवीस आणि अजित पवार यांनी भल्या पहाटे राजभवनात जाऊन घेतलेल्या शपथविधीला आज वर्ष पूर्ण झालं आहे. संख्याबळाच्या अभावी दिड दिवसाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर पुढच्या तीन दिवसात राज्यात महाविकास आघाडी सरकारचा शपथविधी झाला. पण या ऐतिहासिक पहाटेची कायमस्वरूपी राज्याच्या राजकारणात नोंद झाली आहे. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी फडणवीसांना निशाणा बनवत आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

“ती पहाट नव्हती, तो अंध:कारच होता. त्या अंधकारामध्ये सत्तेची प्रकाशकिरणे परत कधीच दिसणार नाहीत”, असे संजय राऊत म्हणाले. “चार वर्षानं पुन्हा आम्हीच जिंकणार आहोत. पहाटे पहाटे मला जाग आली, ते अजून झोपलेले नाहीत. आम्हाला धक्का काही बसला नव्हता. त्या स्मृती आनंददायक आहेत”, असे राऊत म्हणाले. त्या पहाटेनंतर त्यांना धक्के बसलेत, ते अजून सावरलेले नाहीत. वो सूबह फिर ना आयेगी असा मिश्किल टोला त्यांनी भाजपला ‘त्या’ शपथविधीच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने लगावला.

Leave a comment

0.0/5