पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाही जाणार ?

पंतप्रधान-नरेंद्र-मोदी-य-Prime Minister-Narendra-Modi-Ya
ads

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाही जाणार ?

सध्या संपूर्ण जगभरावर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे सर्व जगभराच्या नजरा कोरोनावर मात करणाऱ्या लसीकडे लागले आहे. त्यात पुनावाला यांच्या सिरम इन्स्टिटयूड ऑफ इंडियाने विकसित केलेल्या कोवीशील्ड लसी संदर्भात माहिती घेण्यासाठी शनिवारी २८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे येथे भेट देणार आहेत.

मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधानांच्या कार्यक्रमावेळी पुण्यात उपस्थित राहणार नाहीत. शिष्टाचारानुसार पंतप्रधानांचे स्वागत करायला मुख्यमंत्री हजर असतात. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुसऱ्या मंत्र्यांना मोदी यांच्या स्वागतासाठी पाठवणार आहेत. शिवसेनेचे भारतीय जनता पक्षाबरोबर बिघडलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री जाणार नसल्याची चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशात विविध ठिकाणी सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या संशोधन कार्याचा आढावा घेणार आहेत. अहमदाबाद, हैदराबाद आणि पुण्याला मोदी या निमित्ताने धावती भेट देणार आहेत. पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटला पंतप्रधान मोदी दुपारी भेट देणार आहेत. तिथे ते कोरोना प्रतिबंधक लसीवर सुरू असलेल्या संशोधनाचा आढावा घेणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here