कोण ती नटी भाजपवाल्यांची ‘प्यारी बहना”, पुन्हा सामना अग्रलेखातून कंगनाला टोला

कोण-ती-नटी-भाजपवाल्यांची-Who-she-actress-BJP

कोण ती नटी भाजपवाल्यांची ‘प्यारी बहना”, पुन्हा सामना अग्रलेखातून कंगनाला टोला

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले आहेत. राज्यात फिल्मसिटी मार्गी लागावी तसेच गुंतवणुकीमध्ये वाढ व्हावी या उद्देशाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांनी विविध उद्योजक आणि औद्योगिक कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. तसेच सिनेअभिनेता अक्षय कुमार यांची सुद्धा भेट घेतली. यावरून राजकारण चांगलेच तापू लागले आहे. यावरून आता आजच्या सामना अग्रलेखातून चांगलाच खरपूस समाचार घेण्यात आलेला आहे.

युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मुंबई-महाराष्ट्रात येऊन उद्योगपतींशी चर्चा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. प्रश्न इतकाच आहे, कोणी म्हणत असेल की, मुंबईतले उद्योग पळवून नेऊ, तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही. एका नटीने मुंबईची तुलना पाकव्याप्त कश्मीरशी केली. त्यामुळे ती नटी भाजपवाल्यांची ‘प्यारी बहना’ झाली. भाजपच्या त्याच नटीने ‘पीओके’ म्हटलेल्या मुंबईत भाजप राज्याचे मुख्यमंत्री आपल्या राज्याचा विकास करण्यासाठी येतात हा जणू काळाने घेतलेला सूड आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेने अभिनेत्री कंगना राणावत वर सामना अग्रलेखातून निशाणा साधला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here