महाराष्ट्र मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण ? अमित शहा उत्तर न देता हरियाणाला गेले – अरविंद सावंत

प्रकाश-जावडेकरांच्या-टीक-Prakash-Javadekar's Tick

महाराष्ट्र मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण ? अमित शहा उत्तर न देता हरियाणाला गेले – अरविंद सावंत

महाराष्ट्रात जे काही झालं ते शिवसेनेच्या गद्दारीमुळे झाले. भविष्यात त्यांना या सगळ्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला होता.
जावडेकरांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेचा माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार अरविंद सावंत यांनी खरपूस समाचार घेतला आहे,

गद्दारी आणि शिवसेना हा शब्दच लागू पडू शकत नाही. ‘प्राण जाये पर वचन न जाये’ हे वचन शिवसेना पाळते, असे प्रत्युत्तर खासदार सावंत यांनी दिले आहे. पुढे बोलताना सावंत म्हणाले की, मला आश्चर्य वाटते की, प्रकाश जावडेकर यांचा तोल गेला आहे. सहसा ते असे वक्तव्य करत नाही. पण दुर्दैवाने ते बोलले.

पुढे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची आठवण करून देताना अरविंद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सुद्धा समाचार घेतला होता. राज्याच्या मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपने शिवसेनेला शब्द दिला आहे, की नाही याचे उत्तर अमित शाहा यांनी दिले नाही. ते उत्तर न देता ते हरियाणाला गेले. सत्याला सामोरं जाण्यासाठी धारिष्ट्य लागतं. अमित शाहा गेले ते आलेच नाहीत. याच कारणामुळे महाराष्ट्राने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेला साथ दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here