Skip to content Skip to footer

केंद्राने ३० हजार कोटी थकवले तरी आम्ही पगार, पेन्शन दिली – अजित पवार

केंद्राने ३० हजार कोटी थकवले तरी आम्ही पगार, पेन्शन दिली – अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा केंद्राने थकवलेल्या थकबाकीवरून टोला लगावला आहे. ३० हजार ५३७ कोटी अजून केंद्राने दिलेले नाहीत, तरीही आम्ही पगार आणि पेन्शन थकवले नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत. विधिमंडळ अधिवेशनाला सोमवार पासून सुरुवात झाली असून, सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

सरकार आणि जनता मिळून कोरोनात चांगले काम करतं आहे. सरकार कोविडमध्ये हतबल असल्याचा आरोप केला जात होता. सुरुवातीला केंद्र सरकारने सर्व गोष्टी पुरवल्या होत्या. नंतर मात्र प्रत्येक राज्याने हा खर्च करावा, असे सांगितले. संकट मोठं होतं, उत्पन्न कमी झाले होते. मंदिरं सुरू करण्यासाठीही राजकारण केले गेले.

आज विरोधी पक्षनेते सांगतात राजकारण करायचं नाही, पण त्यांच्याच सहकाऱ्यांनी राजकारण केलं. इंग्लंडला दोन-दोनदा लॉकडाऊन करावा लागला. उद्या काही निर्णय घेतला आणि अंगाशी आला तर विरोधकच म्हणणार यांना थांबता येत नव्हतं का, असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला आहे.

Leave a comment

0.0/5