बायकांच्या पदराआड लढाई करण्याची खेळी ही तुमच्यावर उलटल्याशिवायर राहणार नाही- राऊत
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीकडून नोटिस धाडण्यात आलेली आहे. खात्रीदायक सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार २९ तारखेला वर्षा संजय राऊत यांना चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. यावर आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन ईडी प्रकरणावर भाष्य केले आहे.
ईडी दीड महीन्यांपासून आम्हाला पत्रव्यवहार करत आहे. त्यांना जी माहीती पाहीजे होती ती आम्ही दिली आहे. पीएमसी बॅंक घोटाळ्याबाबात कोणताही संदर्भ दिला नाही तरीसुद्धा भाजपची माकडं उडी मारत आहेत. यांची ईडी बरोबर हात मिळवणी आहे का? गेल्या तीन महीन्यांपासून ईडी कार्यालयावर माझं लक्ष आहे. भाजपची तीन लोकं सतत ईडी कार्यालयात जात आहेत तेथून ते कागदपत्रे घेऊन येत आहेत असे आरोप राऊत यांनी केला आहे.
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार पडणार नाही. मग या सरकारचे खंदे समर्थक आणि प्रवर्तक कोण आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबियांना त्रास द्यायचा. जर हे करणार असाल तर खुशाल करा. ईडी, सीबीआयने ते करावं किंवा आमच्याविरोधात बाहेर कुणी दहशतवादी गँग असेल त्यांनी ते करावं. आम्ही हटणार नाहीत. या सरकारचा बालही बाका होणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली