Skip to content Skip to footer

भाजपा नेत्याचं वादग्रस्त वक्त्यव्य ‘नंगा’ ऊंचा रहे हमारा

भाजपा नेत्याचं वादग्रस्त वक्त्यव्य ‘नंगा’ ऊंचा रहे हमारा

शिवसेना नेते खासदार संजय राऊत ईडीच्या रडारवर आले आहेत. पीएमसी बँकेतील एका कथित घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने नोटीस बजावण्यात आली होती . या प्रकरणात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे सोमवारी पत्रकार परिषद घेऊन भाजपचा चांगलाच समाचार घेतला होता.

मात्र संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर भारतीय जनता पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांनी राऊत आणि शिवसेना पक्षावर जोरदार टिका केली होती. त्यात भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी राऊतांवर टीका करताना अकलेचे तारे तोडत देशभक्तीच्या गाण्याचा वापर करून झेंडा’च्या जागी ‘नंगा’ अशा शब्दाचा वापर केला आहे.


संजय राऊत यांच्या ‘नंगा आदमी हूं’ या वक्तव्यावरून भाजपचे नेते अवधूत वाघ यांनी राऊतांची खिल्ली उडवली आहे. ट्विटरवरून राऊतांची खिल्ली उडवताना अवधूत वाघ यांनी देशभक्तीपर गाण्याचं विडंबन केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे त्यांचं हे विधान चांगलेच भारतीय जनता पक्षाला भोवताना दिसून येणार आहे.

Leave a comment

0.0/5